कराड पासून २० कि.मी. अंतरावर कराड-चांदोली रस्त्यावरील घोगांव येथे हे शैक्षणिक ज्ञानमंदिर विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी या विभागातील शेतकरी, गोरगरीब जनतेच्या मुलांसाठी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांचे हित जपणारी व त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देणारी श्री संतकृपा शिक्षण संस्था अशी ओळख या संस्थेची जनमानसात आहे. या श्री संतकृपा शिक्षण संस्थेचा शैक्षणिक कार्याचा थोडक्यात आढावा..
या शैक्षणिक संस्थेने सन २००४ – साली बी. फार्मसी या डिग्री महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवून शैक्षणिक पर्व सुरू केले डी. फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसी, इंजिनिअरिंगमध्ये
डॉ. बाबासाहेब आंबडेकर टेक्निकल युनिव्र्व्हसिटी, लोणेरे अंतर्गत बी.टेक हा पदवी अभ्यासक्रम तसेच इंटरनॅशनल स्कूल, ज्युनियर – कॉलेज, अशी शिक्षणाची विविध दालने – निर्माण करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची – सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सौ उषा जोहरी, साचव श्री. प्रसून जाहरा उच्चशिक्षित आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या अभ्यासपूर्वक कार्यामुळे संस्थेने सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे.
गौरव डी फार्मसीचा सातारा जिल्ह्यातील पहिले NBA प्राप्त महाविद्यालय :
येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) महाविद्यालयची नॅशनल बोर्ड ऑफ ऑक्रिडिटेशन नवी दिल्ली यांच्या टीमने नुकतीच भेट दिली. त्यांनी तीन दिवस महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली त्यानंतर त्यांनी म केलेल्या मूल्यांकनानुसार महाविद्यालयाला ३० जून २०२६ पर्यंत NBA मान्यता ॥ प्रदान करण्यात आली. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) हे सातारा जिल्ह्यातील पहिले आणि – महाराष्ट्रातील सहावे महाविद्यालय ठरले आहे. यामुळे ‘श्री संतकृपा डी फार्मसी कॉलेज’ची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव प्रसून जोहरी यांनी दिली. महाविद्यालयाला एनबीए मान्यता मिळण्यासाठी वर्षभर अथक परिश्रम घेणाऱ्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व त्यांच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे या यशामध्ये मोलाचे योगदान आहे.
B.Tech:
संस्थेने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात या परिसरातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांना – पदवी अभ्यासक्रमाचे दर्जेदार शिक्षण – आपल्या गावापासून जवळच्या अंतरावर मिळण्यासाठी संस्थेने श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग बी.टेक हा पदवी अभ्यासक्रम सुरू केला.
जागतिक स्पर्धेमध्ये मागणी असणारे सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग असे कोर्स सुरू करून हे नवीन शैक्षणिक दालन उपलब्ध करून दिले. या अभ्यासक्रमासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देऊन संस्थेने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलासा दिला आहे.
फार्मसी :
श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी म्हणजे शिवाजी विद्यापीठात नंबर १ दलेले महाविद्यालय. या बी. फार्मसी ने तर गरूडभरारी घेतली ती सन २००४ प्रारंभापासून. या महाविद्यालयाने सातत्याने अखंडित १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आणि राष्ट्रीय पातळीवर गेट परिक्षेत चमकले आहेत. तर काही विद्यार्थी ग्रीनविच विद्यापीठ, लंडन येथे उच्च शिक्षण घेत आहेत.
B.Tech The Bright future. श्री संतकृपा इंजिनिअरिंग बी.टेक या पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. गुणवत्ता व दर्जा यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी या बी.टेक महाविद्यालयाची प्रवेशासाठी निवड केली आहे. हा या संतकृपा संस्थेने मिळवलेल्या जनमानसातील विश्वासाची पोचपावतीच आहे.
Polytechnic :
इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इंजिनिअर होण्याची सुवर्णसंधी असंख्य विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे.
ज्या अभ्यासक्रमांना हमखास नोकरीची संधी प्राप्त आहे व सध्याच्या युगात जे कोर्स अॅडव्हान्स कोर्स म्हणून ओळखले जात आहेत. त्याच कोर्सची निवड या डिप्लोमा महाविद्यालयाने केली आहे. त्यामध्ये
1) Artificial intelligence and machine Learning.
2) Mechatronics
3) Civil and EnvironmentalnEngineering.
प्रत्येकी ६० विद्यार्थी क्षमता असलेले हे कोर्स असून इंजिनिअरिंग मधील हे अॅडव्हान्स कोर्स आहेत या कोर्सेसना १०० % नोकरीची संधी प्राप्त होत आहे.